रानभाज्या

 कारल्याचे फायदे:


१)कारल्यात फॉस्फरस भरपूर असते. त्यामुळे कफ कमी होतो. बद्धकोष्ठ बरे होण्यास कारल्याची मदत होते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते.


२)कारले यकृताच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ते यकृत स्वच्छ ठेवते आणि त्यांच्या पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. त्यामुळे यकृत दीर्घकाळापर्यंत चांगल्या प्रकारे काम करू शकते.


३)उलट्या किंवा जुलाब होत असल्यास कारल्याच्या रसात थोडे पाणी मिसळून, त्यात काळे मीठ टाकून सेवन करावे लगेचच फरक पडतो.


४)पोटात गॅस अपचन झाल्यास कारल्याचा रस घ्यावा. पक्षाघात झालेल्या रुग्णांना कच्चे कारले फायदेशीर ठरते. दमा असलेल्यांनी मसाला न टाकलेली कारल्याची भाजी खाल्ल्यास फायदेशीर ठरते. कारले रक्तशुद्धीही करते.

टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले अतिशय गुणकारी आहे. ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी मदत करते.


५)जर तुमचे पोट वाढले असेल किंवा लठ्ठपणा असेल. त्यावर कारले गुणकारी ठरते. कारले पचनासाठी उत्तम आहे. त्यामधील अँटिऑक्सिडंट्स चयपचय क्रियेचा वेग वाढवतात. त्यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने खर्च होतात. वजन घटवण्यासाठी डाएटमध्ये कारले हवेच.


६)मुतखड्याच्या रुग्णांसाठी कारले उपयुक्त आहे. कारल्याच्या सेवनामुळे मुतखडे फुटून ते मूत्रमार्गाने बाहेर पडू शकतात.


७)तारुण्यपिटिकेसाठी ते महत्त्वाचे ठरले आहे.

कारल्यात अँटी इन्फ्लामेटचे गुण आहेत, जे त्वचेतून हानीकारक घटकांना दूर करतात. त्यामुळे तारुण्यपिटिका किंवा त्वचेवरील पुटकुळ्यांची समस्या दूर होते.


८)कारले नियमितपणे सेवन केल्यास दमा आणि ब्रोंकाइटीससारख्या श्वासासंबंधी गंभीर आजारांवर मात करू शकता.


९)कर्करोगाशी सामना करण्यासाठी कारले गुणकारी आहे. हे आतापर्यंत अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी ते शरीराला मदत करते.

असे हे कडू कारले आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास खूप फायदेशीर आहे. म्हणून जेवणात कारल्याची भाजी नक्की खावी… *वर्गशिक्षक राजेंद्र नारींगकर विद्या मंदिर तिटवे ता.राधानगरी*

Comments

Popular posts from this blog

माझ्या कामाची पोहोच पावती