Posts

Showing posts from August, 2022

माझ्या कामाची पोहोच पावती

 राजू नारिंगकर आगळ वेगळ व्यक्तिमत्व *एक आगळे व्यक्तिमत्त्व...* *.............राजू नारिंगकर*       *राजू नारिंगकर यांना मी त्यांच्या नोकरीच्या सुरूवातीच्या कालावधीपासून ओळखतो.मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा वेगळी वाट तयार करायची आणि ती मळवायची..अशी क्षमता असणारा एक आगळावेगळा शिक्षक........*        *......सहज नजरेत भरण्यासारखे अध्यापन,अगदी नवा उपक्रम राबविण्यात माहीर....मग ती लहान शाळा असो की मोठी...त्या शाळेत,त्या वर्गात वेगळा ठसा उमटवणारच......*            *शिष्यवृत्ती क्षेत्रात तर अगदी उल्लेखनीय कार्य....शिक्षणाच्या बाबतीत जागरूक आणि जाणकार असलेले कपिलेश्वर गाव त्यांना सोडायला तयार नाही...याच गावाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करुन तीनदा बदली रद्द करुन घेतली....*          *संगणक क्षेत्रातील त्यांचे कार्य अगदी ठळक.....मुलांना संगणकाच्या माध्यमातून सहज सुलभ पद्धतीने एखादा विषय शिकवतात....*            *अॉनलाईन कामात अनेक शिक्षकांना सुद्धा सहकार्य आणि मार्गदर्श...

रानभाज्या

 कारल्याचे फायदे: १)कारल्यात फॉस्फरस भरपूर असते. त्यामुळे कफ कमी होतो. बद्धकोष्ठ बरे होण्यास कारल्याची मदत होते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. २)कारले यकृताच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ते यकृत स्वच्छ ठेवते आणि त्यांच्या पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. त्यामुळे यकृत दीर्घकाळापर्यंत चांगल्या प्रकारे काम करू शकते. ३)उलट्या किंवा जुलाब होत असल्यास कारल्याच्या रसात थोडे पाणी मिसळून, त्यात काळे मीठ टाकून सेवन करावे लगेचच फरक पडतो. ४)पोटात गॅस अपचन झाल्यास कारल्याचा रस घ्यावा. पक्षाघात झालेल्या रुग्णांना कच्चे कारले फायदेशीर ठरते. दमा असलेल्यांनी मसाला न टाकलेली कारल्याची भाजी खाल्ल्यास फायदेशीर ठरते. कारले रक्तशुद्धीही करते. टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले अतिशय गुणकारी आहे. ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी मदत करते. ५)जर तुमचे पोट वाढले असेल किंवा लठ्ठपणा असेल. त्यावर कारले गुणकारी ठरते. कारले पचनासाठी उत्तम आहे. त्यामधील अँटिऑक्सिडंट्स चयपचय क्रियेचा वेग वाढवतात. त्यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने खर्च होतात. वजन घटवण्यासाठी डाएटमध्ये ...

भांड्यांच्या दुनियेत