माझ्या कामाची पोहोच पावती
राजू नारिंगकर आगळ वेगळ व्यक्तिमत्व
*एक आगळे व्यक्तिमत्त्व...*
*.............राजू नारिंगकर*
*राजू नारिंगकर यांना मी त्यांच्या नोकरीच्या सुरूवातीच्या कालावधीपासून ओळखतो.मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा वेगळी वाट तयार करायची आणि ती मळवायची..अशी क्षमता असणारा एक आगळावेगळा शिक्षक........*
*......सहज नजरेत भरण्यासारखे अध्यापन,अगदी नवा उपक्रम राबविण्यात माहीर....मग ती लहान शाळा असो की मोठी...त्या शाळेत,त्या वर्गात वेगळा ठसा उमटवणारच......*
*शिष्यवृत्ती क्षेत्रात तर अगदी उल्लेखनीय कार्य....शिक्षणाच्या बाबतीत जागरूक आणि जाणकार असलेले कपिलेश्वर गाव त्यांना सोडायला तयार नाही...याच गावाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करुन तीनदा बदली रद्द करुन घेतली....*
*संगणक क्षेत्रातील त्यांचे कार्य अगदी ठळक.....मुलांना संगणकाच्या माध्यमातून सहज सुलभ पद्धतीने एखादा विषय शिकवतात....*
*अॉनलाईन कामात अनेक शिक्षकांना सुद्धा सहकार्य आणि मार्गदर्शन करतात.*
*विज्ञान प्रदर्शन,प्रश्नमंजूषा या क्षेत्रात सुद्धा मुलांना भाग घ्यायला लावून हमकास यश मिळवून देणारच.......*
*सध्या राजू नारिंगकर विद्या मंदिर तिटवे शाळेत इयत्ता सातवीचा वर्ग हाताळतात.सुरुवातीपासूनच या वर्गावर त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.समरकँपचेच उदाहरण द्यायचे झाले तर हा कँप प्रथम विद्या मंदिर तिटवे शाळेत राजू नारिंगकर यांनी सुरु केला.परीक्षेनंतर सुद्धा मुले शाळेत खिळून राहावीत हाच त्यांचा उद्देश....त्यानंतर दहा दिवसांनी जिल्हा परिषद कोल्हापूरने परिपत्रक काढून संपूर्ण शाळांना हा उपक्रम राबविण्यास सांगितला......*
*जुलैमध्ये असाच एक आगळावेगळा उपक्रम राबविला...तो पुरातन काळातील वस्तूंचे प्रदर्शन.या उपक्रमाची तर वर्तमान पत्राने स्वतःहून नोंद घेऊन प्रसिद्धी दिली*
*जुले 2019 पासून त्यांनी असाच एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला..तो म्हणजे"एक शब्द- एक निबंध" .....मुलांना एक शब्द द्यायचा आणि त्यावर त्यांनी दहाबारा ओळी माहिती लिहून आणायची...... गंमत म्हणजे हाच उपक्रम दैनिक सकाळने गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2020 पासून स्मार्ट सोबती या सदरात सुरू केला.यालाच सर्जनशीलता हा गुण म्हणतात..तो नारिंगकर यांच्यात जबरदस्त आहे....म्हणूनच ही व्यक्ती आगळीवेगळी अशी आहे*
*राजू नारिंगकर यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा*
*शब्दांकन:संभाजी पाटील(राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित)*
Comments
Post a Comment